राज्यात फडणवीसांच्या सभा, भाजपने मोठी रणनीती आखली

मुंबई : राज्यात आगामी काही काळात निवडणुकांचा हंगाम सुरू होणार असून राजकीय सभांचा धुराळा उडणार आहे. यातच आता २० ते ३० जून या दहा दिवसाच्या दरम्यान भाजपकडून समर्थन अभियान सुरू करण्यात येणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहा सभा होणार आहेत. अशी माहिती भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

समर्थन अभियान भाजपकडून राबवण्यात येणार असून या दरम्यान भाजपच्या एकूण ३५ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रभावशाली व्यक्तींना भेटणं, घराघरात जाऊन संपर्क करणं, मोदींच्या कार्यकिर्दीची माहिती देणे असा कार्यक्रम होणार असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही सभा होणार आहेत.

राज्यातील  48 लोकसभेपैकी आम्ही जवळपास या ठिकाणी 35 एक सभांचे नियोजन या ठिकाणी झालेला आहे. पहिल्या टप्प्यातल्या एक ते दहा तारखेचे जे कार्यक्रम होते ते अत्यंत यशस्वी झालेले आहेत. आता राहिलेले कार्यक्रम टिफिन बैठक आमच्या आमदार खासदारांच्या सुरू आहेत. 21 तारखेला योग दिवस , 23 जूनला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन बलिदान दिवस म्हणून त्या ठिकाणी होणार आहे. आणीबाणी दिवस 25 जून आणि मन की बात 23 जून आहे. अशा प्रकारे आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत आणि शेवटी 20 ते 30 जून असा संपर्क असे समर्थक व प्रभावशाली व्यक्तींना भेटणं घराघरात जाऊन संपर्क करणं मोदी साहेबांच्या कारकीर्दीची माहिती देणे असा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे.

दरम्यान,  अमित शहा यांची नांदेड येथे सभा पार पडली. त्यानंतर महाराष्ट्रात एक माहोल निर्माण झाला असून आता देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा सिलसिला सुरू होणाह आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच केंद्रीय मंत्र्यांसह गिरीश महाजन, आशिष शेलार, यांच्याही सभा होणार असल्याचं दरेकरांनी म्हटलं आहे.

See also  मोहोळ यांच्या झैनी मशिदीत बोहरी बांधवांशी गप्पा