कोथरूड मध्ये सहा ऑक्टोबर पासून जेष्ठोत्सवाचे आयोजन

कोथरूड : कोथरूड येथील”पुण्याई” सभागृहामध्ये ज्येष्ठोत्सव निमित्त” सन वर्ल्ड फॉर सीनियर्स” स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दिनांक सहा, सात,आठ, ऑक्टोबर रोजी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

अलका मांगले लिखित, आणि दिग्दर्शित एकांकिकेमध्ये “नवचैतन्य हास्य क्लब बाणेर शाखा “सादर करणार आहे एक सामाजिक एकांकिका “दार उघड बये दार उघड” असणार आहे.

कार्यक्रमाचे रूपरेषा पुढील प्रमाणे –
*दि.६ ऑक्टोबर २०२३*
सकाळी ९.०० पुण्याई सभागृहाच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये कार्यक्रमाचे अनौपचारिक उदघाटन

सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० याच हॉलमध्ये एकांकिका स्पर्धांचे पहिले सत्र ( दुपारी एक तास भोजनाची वेळ.)

दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये
सकाळी ९.३० ते १२.०० समूहगीत स्पर्धा
दुपारी २.१५ ते ५.०० नाट्यछटा स्पर्धा

*दि.७ ऑक्टोबर २०२३*

पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये सकाळी ९.३० ते ६.३० एकांकिका स्पर्धेचे दुसरे सत्र (दुपारी एक तास भोजनाची वेळ.)
दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये
९.३० ते १० .३० कल्पना विस्तार स्पर्धा
१०.३० ते ११.३० काव्य पूर्ती स्पर्धा
११.३० ते १.०० गटचर्चा

*रविवार दि. ८ ऑक्टोबर २०२३*
दुपारी ३.०० ते ७.०० सांगता समारंभात
प्रथम एकांकिका,समूहूगीत , कल्पना विस्तार, काव्यपूर्ती, नाट्यछटा व गटचर्चा या सर्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे सादरीकरण होईल.

पुरस्कार वितरण समारंभ

परिक्षकांचे मनोगत

प्रमुख पाहुण्यांचे भाषण.

See also  माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे वेताळ टेकडीस भेट