चिपको आंदोलनाला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद

पुणे: नदी सुशोभिकरण प्रकल्पा अंतर्गत मुळा-मुठा किनारी पट्टा ९,१०,११ दरम्यान होत असलेली ७५०० वृक्षांची तोड त्वरित थांबवण्यात यावी असा सणसणीत इशारा पुणे महानगरपालिकेला सजग पुणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून चिपको आंदोलन करत दिला.

पुणे रिवर रिवायवल ने आयोजित केलेल्या चिपको आंदोलनाला ६७ सामाजिक संस्थांनी तसेच मनसे ( पर्यावरण विभाग ) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शहर विभाग), कॉंग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी पुणे शहर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट इत्यादी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला तसेच पुणे शहरातील विविध पर्यावरण संस्थांचे पदाधिकारी व नागरिक आंदोलना मधे सहभागी झाले होते.

वृक्षतोड विरोधातील निषेध मोर्चा संभाजी उद्याना पासून सुरू होऊन जंगली महाराज मार्गे डेक्कन जिमखाना बॅस स्टॅड पासून खाली उतरून नदी काठच्या रस्त्याने एस एम जोशी पुला पर्यत गेला.
जवळपास पुणेकर नागरिक हातामधे “झाडे वाचवा, नदी वाचवा, पुणे वाचवा”, “मुळा-मुठा वाचवा”असे फलक घेऊन सामिल झाले होते. ह्यामधे विद्यार्थी तसेच महिलांचा सहभाग लक्षणीय होता. नागरिकांनी झाडांना अलिंगन देऊन वृक्षतोड त्वरित थांबवण्यासाठी लाक्षणिक आंदोलन केले. मोबाईल वॅन वर प्रत्यक्ष साईट वरच्या वृक्षतोडीचे क्षणचित्र आणि व्हिडिओ स्क्रिन वर दाखवण्यात आले.

See also  पुणे बुलेटिनच्या प्रथम वर्धापन दिनास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती