बाणेर परिसरातील राजकीय जेष्ठ नागरिकानीच हाताळले मासिक मोहल्ला कमिटी मीटिंग.. सहाय्यक आयुक्तांची बघ्याची भूमिका

औंध :- औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय मध्ये दर महिन्याला मोहल्ला कमिटी मीटिंगचे आयोजन करण्यात येते या मोहल्ला कमिटीमध्ये परिसरातील नागरिक आपल्या समस्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सांगून त्याचे निरसन होईल अशा अपेक्षेने आपल्या समस्या घेऊन येतात. सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश उत्सवामुळे सप्टेंबर महिन्यातील मोहल्ला कमिटी मीटिंग गुरुवार दिनांक पाच रोजी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी औंध बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वर वाडी बोपोडी परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. क्षेत्रिय सहाय्यक आयुक्त यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना या समस्यांच्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

परंतु या मोहल्ला कमिटीचे वैशिष्ट्य म्हणजे साधारण एक तास मीटिंग झाल्यानंतर परिसरातील राजकारणातील एक ज्येष्ठ नागरिक या मीटिंगमध्ये आल्यानंतर त्यांनीच या मीटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे मिटींगचे आयोजन नक्की क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केले का या राजकीय ज्येष्ठ नागरिकांनी केले यात संभ्रमात मिटींगला उपस्थित असलेले नागरिक पडले. नागरिकांनी देखील आपल्या समस्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना न सांगता या राजकीय ज्येष्ठ नागरिकालाच सांगत असल्याचे दिसून आले. व हे राजकीय ज्येष्ठ नागरिक संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करत असल्याचे दिसून आले परंतु याचवेळी ज्या सहाय्यक आयुक्तांच्या समोर ही मोहल्ला कमिटी मीटिंग चालू होती ते मात्र गप्प राहिल्याचे दिसून आले त्यामुळे नक्की मिटींगचे आयोजन महानगरपालिकेतर्फे सहाय्यक आयुक्तांनी केले का राजकीय नागरिकांनी केली याच संभ्रमामध्ये नागरिक पाडल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी आपल्या समस्या न सांगता या मिटिंग मधून उठून जाणे पसंत केले.


या मोहल्ला कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला औंध परिसरातील मोठ्या प्रमाणात साचत असलेल्या कचऱ्याबाबत गणेश कलापुरे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमोर तक्रार केली, नाना वाळके यांनी डीपी रोड परिसरामध्ये नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे सांगितले, सचिन दळवी यांनी देखील सोमेश्वर वाडी परिसरामध्ये पाणी प्रश्न गंभीर झालेला असून लवकरात लवकर यातून मार्ग काढावा अशी विनंती अधिकाऱ्यांना केली, तर बालेवाडी रेसिडेंस असोसिएशनच्या सदस्यांनी बालेवाडी मध्ये रस्ते ड्रेनेज याचे झालेले दुरावस्था सहाय्यक आयुक्तांसमोर मांडली व लवकरात लवकर याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सहाय्यक आयुक्तांकडे केले. बोपोडी परिसरातील बंद पथदिवे तसेच स्मार्ट सिटी तर्फे करण्यात येत असलेली सुशोभीकरणाची कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या, डीपी रोड परिसरामध्ये अनधिकृत रित्या दुकानदारांनी बांधलेल्या शेडवर कारवाई करण्याची मागणी रमेश ठोसर यांनी केली. तर संजय कांबळे यांनी बोपोडी परिसरातील प्रश्न उपस्थित केले. यावेळी अनेक तक्रारी बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी औंध बोपोडी परिसरातील नागरिकांनी सहाय्यक आयुक्तांसमोर मांडल्या.

मोहल्ला कमिटी मध्ये मांडण्यात आलेल्या समस्यांचे निरसन होत नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी सहाय्यक आयुक्तांसमोर मांडल्या प्रत्येक मोहल्ला कमिटी मध्ये तेच तेच विषय वारंवार येतात परंतु महानगरपालिकेतर्फे कोणत्याही प्रकारे ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

See also  पुणे महानगरपालिकेने गळती रोखण्यासह आवश्यक उपाययोजना कराव्यात-अजित पवार