राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड आयटी सेल अध्यक्षपदी राहुल गोडसे यांची नियुक्ती

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार )पिंपरी चिंचवड आयटी सेल अध्यक्ष पदी राहुल गोडसे यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी राहुल गोडसे यांचे आय.टी. सेल अध्यक्ष पदी नियुक्ती केली. खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते गोडसे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आयटी क्षेत्राच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये भरीव कार्य करत राज्यभरातील तरुणांना काम करण्याची संधी दिली. त्यांचा विचार पुढे घेऊन हिंजवडी तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच या परिसरातील कंपन्यांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने काम करणार असल्याचे यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आय.टी.सेल शहराध्यक्ष राहुल गोडसे यांनी सांगितले.

See also  राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलांचा संघ उपविजेता तर मुलींच्या संघास कांस्य पदक