संगमवाडी गावातील स्मशानभूमीचे काम पूर्ण करण्यात यावे; मनसेची मागणी

संगमवाडी : संगमवाडी गावातील स्मशानभूमीची काम निधी अभावी गेले १० ते १२ वर्ष झाले अपूर्ण अवस्थेत आहे. हे गाव मनपा हद्दीत आहे की ग्रामपंचायत हद्दीत हेच समजत नव्हते. पुणे मनपा पासून २ किलोमीटर वरील गावात हि अवस्था आहे. उन्हापावसात महिला, जेष्ठ नागरिक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात एक महिला बेशुध्द होऊन पडली होती. मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत असून या स्मशानभूमीची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

मनसेने ३ वर्षांपूर्वी पण आंदोलन केले होते व हे रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी मनसेच्या वतीने पुणे मनपाच्या आयुक्तांशी सतत पत्रव्यवहार करत अखेर जुन २०२३ ला मनपा प्रशासनाने निधी मंजूर केला. पाठपुराव्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महाराष्ट्र सरचिटणीस रणजितदादा शिरोळे, पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, विभागाध्यक्ष विनायक कोतकर, उपविभागाध्यक्ष गोकुळ अडागळे, स्थानिक शाखाध्यक्ष मिलन भोरडे, मुकेश खांडरे, गोकुळ पवार, अभिजीत ताठे, तेजस मोहिते, प्रयाग भोरडे, कुशल खांडरे, अभि परदेशी, हरदीप पवार, अंकुश हांडे, रोहित चपटेकर महाराष्ट्र सैनिकांनी मोठी मेहनत घेतली.

See also  बालेवाडीत बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी नामांकित  बांधकाम व्यावसायिकास दंड करण्यास टाळाटाळ