बाणेर : बाणेर परिसरात वास्तव्यास असणारे मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले ए. पी. आय श्री.विशाल किसनराव जाधव यांनी तैवान येथे संपन्न झालेल्या आशियायी पिकलबॉल गेम्स २०२३ मध्ये व्यक्तिगत क्रिडाप्रकारात सुवर्ण पदक व सांघिक क्रिडा प्रकारात रौप्य पदक जिंकून भारत देशाचा तिरंगा फडकावला म्हणून माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर व भाजपा महाराष्ट्र राज्य ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
ए. पी. आय श्री.विशाल जाधव यांनी आशियायी पिकलबॉल गेम्स २०२३ मध्ये व्यक्तिगत क्रिडाप्रकारात सुवर्ण पदक व सांघिक क्रिडा प्रकारात रौप्य पदक जिंकून अभिमानास्पद कामगिरी करत देशाचे तसेच आपल्या परिसराचे नाव उंचावले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी तुषार चाकणकर, सचिन सायकर, श्रीकांत सायकर, मयुर लखावत, सतीश ढेपे, मंगेश बालवडकर, तुषार बालवडकर, सच्चिदानंद सायकर, काशिनाथ कलशेट्टी, श्रीकांत भांडवलकर, संदीप तुपे, जीवन उफाडे, बालाजी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.