मुकुंद नगर येथे १२० बांधकाम कामगारांना इण्डस्ट्रेल साहित्य पेट्या वाटप


पुणे : भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघ व एकता सेवा प्रतिष्ठान च्या वतीने मुकुंदनगर संपोजो आश्रम येथे असंघटित क्षेत्रातील १२० कामगारांना साहित्य संच भेट देण्यात आली. कार्यक्रम यावेळी असंघटीत कामगारांची महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करण्यात आली होती.
अशा नोंदणीकृत कामगारास अवजार साहित्य संच व प्रमाणपत्रांचे वाटप कार्यक्रम सुरूवात गणेश शेरला यांच्या माध्यमातून करण्यात आले.

सभागृहनेते श्रीनाथ भिमाले , उद्योजक सुनील मारणे , सुनिल शिळीमकर,मनीष साळुंखे ,जीवन माने ,हरीश परदेशी ,किरण वैष्णव ,तुकाराम डुबेकर,गौतम बनसोडे,रमेश बिबवे ,राजेंद्र शहा ,अनिल निळूकर ,दत्ता बिबे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगारांना पेट्या भेट देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक कडवळे यांनी केले.

कामगारांना देण्यात आलेल्या पेट्या मध्ये ,पत्र्याची पेटी ,हेल्मेट,
सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, (रोप),सोलर चार्ज बॅटरी,सेफ्टी जॅकेट
सेफ्टी हॅन्ड ग्लोज,इत्यादी साहित्य असलेला संच गणेश शेरला यांनी दिला.

अनेक असंघटित कामगारांनी यावेळी गणेश शेरला यांच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी व बांधकाम कामगार कामगारासाठी अनेक फायदे मिळून देणार आहे .कामगार कल्याण मंडळाकडे नोंद करून हे फायदे यांना पुढील काळात मिळतील माहिती पुस्तक प्रत्येक कामगाराला भेट देण्यात आली.
महाराष्ट्र कामगार मंडळाकडे बांधकाम मजुरांची नोंदणी फॉर्म सुद्धा वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात यशस्वी होण्यासाठी मारुती कांबळे,नाना कडवळे ,सचिन खंडागळे ,हेमंत जगताप ,अजय शिंदे, राहुल कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले

See also  शिवसेना महिला आघाडी वडगावशेरी मतदार संघाच्यावतीने मंगळागौरी स्पर्धा सौ.नेहा योगेश शिंदे यांनी स्पर्धेतून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले - सौ.वृषाली श्रीकांत शिंदे