सुस : भाजपा आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहितेपाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रामाणिक पाठपुराव्याला यश आले असून सुसगाव येथील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी फंड देखील उपलब्ध करून दिली आहे.
गेले वर्षी जुलै महिन्यात राज्याच्या अधिवेशना दरम्यान विधानपरिषद आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहितेपाटील यांनी सभागृहात आवाज उठवत सिम्बायोसिस हॉस्पिटलला जाण्यासाठी एकमेव मार्ग असणाऱ्या आणि वारंवार या मार्गावर ट्रॅफिक होऊन त्यात रुग्णवाहिका अडकून रुग्णांची प्रचंड हेळसांड होण्यासंदर्भात पुणे मनपाच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस गावातील रस्ता रुंदीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केलेला होता.
प्रसंगी मोहिते पाटील यांनी आमदार फ़ंडातील निधी सदर कामासाठी द्यावा पण सर्वसामान्य नागरिकांचा हा प्रश्न तात्काळ सोडवावा या अनुषंगाने त्यावेळी सभागृहात चर्चा झालेली होती. तदनंतर या आशयाचे आपले मागणीपत्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिनांक ११ जुलै २०२४ रोजी दिलेले होते.त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन त्या मागणी संदर्भात आवश्यक ती कारवाई लवकरात लवकर करण्यासंदर्भात आदेश दिलेले होते.
यानंतर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात सदर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरु करण्यात आले आहे.
आमदार रणजिसिंहदादा मोहितेपाटील यांनी सर्वप्रथम सदर प्रश्नाला जाहीररित्या वाचा फोडून या संदर्भात वेळोवेळी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांचेसोबत प्रत्यक्षात वेळोवेळी पाठपुरावा करून अखेर हे काम मार्गी लावले आहे त्याबद्दल सुस गावातील नागरिकांनी आमदार रणजितसिंह मोहितेपाटील यांचे आभार व्यक्त केले.
घर ताज्या बातम्या आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहितेपाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुसगाव येथील रस्ता रुंदीकरणाचे काम...