नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ‘नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा’ विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे पुण्यात शुक्रवारी आयोजन

पुणे : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महिला विषयक शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर, येरवडा येथे ‘नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील १० ठिकाणी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागूपर या विभागीय आयुक्तालयात, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, वणी या साडेतीन शक्तीपिठांच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

सदरचा कार्यक्रम निशुल्क असून अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ असे, आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

See also  बार्टी व सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यावतीने अट्रॉसिटी कायदा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न