मा.आमदार विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर

पुणे :- पुणे शहरातील शिवाजीनगर मतदार संघातील कार्यसम्राट मा.आमदार (कै.) आबा उर्फ विनायक निम्हण यांनी स्थापन केलेल्या सोमेश्वर फाऊंडेशनकडे कमी उत्पन्न गटातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची
तारीख आज २१ ऑक्टोबर २०२३ पर्यंतवाढवण्यात आली आहे. कमी उत्पन्न गटातील इयत्ता ५ वी व ८ वी मधील शिष्यवृत्ती परीक्षेत अल्पगुणांमुळे शिष्यवृत्तीस पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येऊ शकेल.

तसेच अल्प उतपन्न गटातील महाविद्यालयीन विविध विद्याशाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या व ७५ टक्केहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देखील अर्ज करता येऊ शकेल. sunnynimhan.com यावर अर्ज करावा असे आवाहन मा. नगरसेवक सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांनी केले आहे.

See also  पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.राम ताकवले यांच्या नातेवाईकांची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट