कोकाटे तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2023 बक्षीस समारंभ संपन्न

पाषाण : पाषाण परिसरातील विविध हौसिंग सोसायटीसाठी कोकाटे तालीम मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव सजावट /सामाजिक उपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. पुणे शहर भाजपा चिटणीस श्री राहुल कोकाटे व मयुरी ताई कोकाटे यांच्या वतीने यावर्षीही मोठ्या उत्साहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.पाषाण परिसरातील 31 सोसायट्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला फेसकॉम महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष अरुणजी रोडे, पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या अनुजा बाली, सेवा सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित तोडकर, अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक भारती यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.


सर्वोत्कृष्ट सजावट प्रकारामध्ये क्रिस्टल गार्डन हाऊसिंग सोसायटीचा प्रथम क्रमांक पटकावला, पर्यावरण पूरक गणेश उत्सव या प्रकारात कृष्णकमल सोसायटीचा प्रथम क्रमांक मिळाला, पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे या प्रकारात माउंट व्हर्ट ग्रँड सोसायटीचा प्रथम क्रमांक मिळाला, उत्कृष्ट कला व क्रीडा आयोजन या प्रकारामध्ये अलंकापुरी सोसायटीचा प्रथम क्रमांक मिळाला, तर सांस्कृतिक उपक्रम या प्रकारामध्ये स्वामी समर्थ सोसायटीचा प्रथम क्रमांक मिळाला. अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी राहुल कोकाटे यांचे आभार मानले व असे समाज उपयोगी उपक्रम सतत राबवावे व नागरिकांचा सहभाग वाढवावा, तसेच नागरिकांचे एकमेकांशी संवाद वाढवून परिसरातील सांस्कृतिक वातावरण, पर्यावरणाचे संरक्षण, व नागरी सुविधा सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही नागरिकांनी यावेळी इच्छा व्यक्त केली.


श्री रत्नाकर मानकर, सौ वंदना सिंग, श्री रघुनाथ उत्पात, श्री उत्तम जाधव यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रज्वल कोकाटे, दत्ता ववले, अभिजीत देशपांडे, प्रवीण आमले, अभिषेक पिंजन यांनी सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

See also  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरण१ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता