नवी दिल्ली : महाविकास आघाडीतील सहयोगी खासदारांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपींना आजपर्यंत अटक न झाल्यामुळे संसद भवनाच्या दारात आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या हत्याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रियांका गांधी, खा. अमोल कोल्हे, खा. भास्कर भगरे, खा. बजरंग सोनावणे, खा. निलेश लंके, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. वर्षा गायकवाड, खा. प्रणिती शिंदे, खा. शोभा बच्छाव, खा. रविंद्र चव्हाण, खा. गोवाल पाडवी, खा. नामदेव किरसन, खा. प्रशांत पाडोळे इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
