दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त निम्हणमळा सिद्धिविनायक मंदिरामध्ये दीप महोत्सव

पाषाण : दिवंगत कार्यसम्राट माजी आ. विनायक (आबा) महादेव निम्हण यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त निम्हण मळा मित्र मंडळ आयोजित श्री सिद्धिविनायक मंदिरात दीप महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी श्री संजय अप्पा निम्हण, श्री अशोक भाऊ दळवी, श्री गणेश जावळकर, श्री अजित निम्हण , श्री अमित शिंदे, श्री प्रितम निम्हण, श्री दत्तोबा निम्हण, श्री मदन राऊळ, श्री सुनिल ढवळे, श्री अभिजित कदम, श्री निखिल निम्हण , तेजस निम्हण, श्री विकास माळवदकर, श्री सुनिल बाणेकर, श्री सुभाष तात्या निम्हण, श्री सुरेशभाऊ निम्हण, श्री गणेश कदम यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली, याप्रसंगी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

यावेळी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीप महोत्सवाच्या निमित्ताने मंदिराच्या परिसरात दिव्यांची आरास करण्यात आली होती.

See also  एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा- अजित पवार