पुणे पालिकेत बोगस अभियंता पदविका सादर करणाऱ्यांवर आम आदमी पार्टीची कारवाईची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिकेत बोगस अभियंत्यांचा सुळसुळाट झाला असून तब्बल ४२ बोगस अभियंते पालिकेत वावरत आहेत. याबाबत आम आदमी पार्टीने पुणे मनपाबाहेर आंदोलने केली आहेत. पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची तार तत्कालीन मनपा महापौर व भाजपचे अनेक नगरसेवक यांच्याशी जुडली आहे. त्यामुळेच गेली २ वर्षे मनपा आयुक्त हे त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देत आहेत असे आम आदमी पार्टीचे डॉ .अभिजीत मोरे यांनी सांगितले.

याबाबत कारवाई रोखण्यासाठी बोगस अभियंत्यांनी प्रत्येकी सुमारे १०लाख रुपये दिल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून बोगस अभियंत्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा पसरली आहे. अशा चर्चामुळे पुणे मनपाची बदनामी होत आहे. बोगस अभियंत्यांवर कारवाई करून ही बदनामी थांबवण्याची संथी आपणास आहे. काल दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या कार्यालयीन परिपत्रक जावक क्र: मआ / साप्रवि / प्र. ३/ १००९५ या परिपत्रकामध्ये मनपातील कनिष्ट अभियंता (स्थापत्य ) या पदासाठी विहित शैक्षणिक आ्हता धारण करणाच्यामधून ८५% पदे नामनिर्देशनाने तर १५% पदे मनपा कर्मचार्यांतून (५ वर्षाचा अनुभव आवश्यक) परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार पदोन्तीने भरणार आहेत असे नमूद केले आहे. माननीय आयुक्तांच्या या परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये दिलेल्या ६० कर्मचा्यांची परीक्षा दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी घेतली जाणार आहे.

या यादीवर आम आदमी पार्टीचा आक्षेप असून या यारदीतील १८ मनपा कर्मचार्यांनी जे आर एन राजस्थान विद्यापीठ येथून दूरस्थ पद्धतीने अभियांत्रिकी पदविका मिळवल्याची बोगस प्रमाणपत्रे सदर केली.

नावे खालीलप्रमाणे –
1) लोखंडे अनिल संदिपान- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

2) नेवसे धनंजय मारूती- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

3) रासकर राजेश प्रभाकर- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

4) घोडके गणेश राजाराम- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

5) वाईकर मुकुंद रघुनाथ-जे आर एन राजस्थान विद्यापीठ

6) मांढरे मयूर अरुण- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

7) टंकसाळे दिनेश यशवंत- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

8) कानसकर शरद बाळासाहेब-जे आर एन राजस्थान विद्यापीठ


9) शेख निसार अब्दुल रहिमान- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

10) भोइर विजय खेवजी- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

11) मते कुणाल उत्तमराव- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

12) मते रुपेश अर्जुन- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

13) हांडे नितीन भालचंद्र- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

14) पोकळे शाहू संभाजी- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

15) पवार अमोल दिलीप- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

16) देवकर उमेश प्रकाश- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

17) लोखंडे नितीन संदिपान- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

18) पोखरकर बजरंग फौजदार- जे आर एन राजस्थान विद्यापीठ

See also  राज्यात २० ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन करणार मतदारांची पडताळणी-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे मनपाच्या जावक क्रमांक- अतिमआ (ज )/ साप्रवि/ ७६४१, दि. ३ डिसेंबर २०२१ पत्रातील प्रारूप सेवा जेष्ठता यादीतील या १८ मनपा कर्मचारी यांवर आम आदमी पार्टी तर्फे डॉ.अभिजित मोरे यांनी वेळोवेळी लेखी आक्षेप नोंदवून त्यांची पदविका ही नियमबाह् असल्याचे आपणास सप्रमाण दाखवून दिले आहे.

अभियांत्रिकी हा प्रात्यक्षिकासोबत पूर्ण वेळ करावयाचा कोर्स असल्याने दूरस्थ पद्धतीने तो शिकता येत नाही. AICTE ची मान्यता नसल्याने दूरस्थ शिक्षण पद्धतीने प्रदान केलेल्या अभियांत्रिकी पदवी, परदविका ह्या नियमबाह् आहेत आणि त्याआधारे कोणतीही पदोन्नती, सरकारी नोकरी देऊ नये असा स्पष्ट निर्वाळ्ा सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी दिलेला आहे. (Supreme Court of ।ndia-CIVIL APPEALNOS.17869-17870 /2017 (Arising out of Special Leave Petition (C) Nos.19807-19808/2012- ORISSA LIFT IRRIGATION CORP. LTD..APPELLANTS VERSUS RABI SANKAR PATRO & ORS….RESPONDENTS); Punjab and Haryana High Court- CWP No.20430 of 2011 (0&M) and conmnected cases).

 याबाबत AICTE, UGC यांची अनेक परिपत्रके आहेत. एवढेच नव्हे तर पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंह यांनी देखील अशा दूरस्थ शिक्षण पद्धतीने अभियांत्रिकी पदवी, पदविका घेतलेल्यांना नोकरी अथवा पदोन्नती देऊ नये असे आदेश काढले होते. पण विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणार्या पुण्याच्या मनपामध्ये मात्र बोगस अभियंत्यांना पदोन्नती दिली जात आहे.