क्रिडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य शिवजयंती साजरी

बालेवाडी  : म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री.शिवछत्रपती क्रिडा संकुल याठिकाणी क्रिडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी पारंपारीक ढोल-ताशा पथक, पोवाडा गायन, मर्दानी खेळ व शिवकालिन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बालेवाडी येथील शिवभक्तांनी किल्ले सिंहगड ते बालेवाडी अशा आयोजित  मशाल यात्रेचे स्वागत केले.
तसेच छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करुन महाराजांना त्रिवार वंदन केले.
यावेळी सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व शिववंदना संपन्न झाली.

See also  व्यक्तीवाद लोकशाहीसाठी धोक्याचा – अशोक वानखेडे ; मान्यवरांच्या हस्ते सुनील माने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन