वाघेश्वरी विद्यालय,पिंगोरी येथे किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण

सासवड : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ,सासवड संचलित वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय ,पिंगोरी या विद्यालयामध्ये विद्यालयात सासवड सांस्कृतिक आयोजित किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम साजरा करण्यात आला .

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष स्व.चंदुकाका जगताप तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री शांताराम राणे यांनी केले. युवा नेते दत्ताराजे शिंदे ,शरद जगताप, शोभा चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून किल्ले स्पर्धेचे महत्व समजावून सांगितले.

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंटी गायकवाड मुख्याध्यापक श्री.शांताराम राणे, शरद जगताप, संतोष यादव, आकाश शिंदे , तेजस शिंदे, श्रवण शिदे,सहशिक्षक श्री.भावराव ठाकरे, सहशिक्षिका शोभा चव्हाण, विद्या जगताप रुपाली पवार, शिक्षकेत्तर अमित बोरावके,श्री सागर भगत, श्री हेमंत भोसले तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रूपाली पवार मॅडम यांनी केले. तर आभार विद्या जगताप मॅडम यांनी मानले.

See also  सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे मतदान जागृती