राजधानीत संत जगनाडे महाराज जयंती साजरी

नवी दिल्ली, 8 : संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात वर्धा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार व डॉ. प्रतिमा गेडाम उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थ‍ितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी खासदार रामदास तडस यांनी संत जगनाडे महाराजांबद्दल आपले विचार मांडले. ते म्हणाले की, संत जगनाडे महाराज हे एक महान संत होते.त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देतात .
महाराष्ट्र परिचय केंद्रात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी संत जगनाडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

See also  विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे-सहकर मंत्री दिलीप वळसे पाटील