लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी लायन नितीन थोपटे व लिओ क्लबच्या अध्यक्षपदी लिओ वेदांत थोपटे यांची निवड.

पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे चतुर्शिंगी या क्लबचा शपथविधी व पदग्रहण समारंभ नुकताच हॉटेल ऑर्बिट येथे पार पडला.

पीडीजी लायन जितेंद्र भाई मेहता यांनी अध्यक्ष लायन नितीन थोपटे, सेक्रेटरी लायन महेश खडके व ट्रेझरर लायन प्रमोद कुमार लढढा व लिओ अध्यक्ष वेदांत थोपटे यांना अध्यक्षपदाची शपथ दिली तसेच लायन श्रेयस दीक्षित यांनी 9 नवीन मेंबर्स चे इंडक्शन केले.

याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुणे चतुर्शिंगी चे ला. रवी गोलार, ला.‌रेश्मा थोपटे, झेडसी नागेश चव्हाण, लायन बोराजी, लायन दीपक सामल, डॉ. जाजू व इतर सर्व पदाधिकारी, मेंबर्स व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोहिणी देशमुख व लायन छाया भनगे यांनी केले आणि आभार प्रदर्शन लायन नयना रोड्रिक्स यांनी केले.

याप्रसंगी भवानी पेठेतल्या शाळेतील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना रुपये पंचवीस हजारांची पुस्तके वाटप केले.

तसेच एका गरीब कुटुंबातील दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी रुपये पस्तीस हजाराचा धनादेश सुद्धा दिला.

तसेच ममता फाउंडेशन, कात्रज येथील एड्स ग्रस्त मुलांच्या संस्थेला रुपये 12 हजाराचे ज्यूस कॅन चे वाटप करण्यात आले.

See also  पुस्तक महोत्सवाने सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची मान उंचावली- डॉ.नीलम गोऱ्हे