भिडे वाड्याची धोकादायक इमारत पुणे महानगरपालिकेने पाडली

पुणे : सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी भिडे वाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची इमारत पुणे महानगरपालिका व पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत सक्तीने ताब्यात घेण्यात आली. यावेळी धोकादायक झालेला भिडे वाडा जेसीबीच्या साह्याने जमीन दोस्त करण्यात आला.

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासंदर्भातील ठराव पुणे महानगरपालिकेमध्ये मंजूर करण्यात आला होता. जागा ताब्यात घेण्यासंदर्भात तेरा वर्षापासून न्यायालयीन खटला चालू होता. सर्वोच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेच्या बाजूने निकाल देत जागा पालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते.

पुणे महानगरपालिकेच्या भूसंपादन विभागाने मालक व भाडेकरू यांना नोटीस देत जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. रात्री साडेनऊ वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त साईनाथ करण्यात आला होता यानंतर रात्री पावणे अकराच्या दरम्यान दोन जेसीबीच्या साह्याने मोडकळीस आलेला वाडा पाडण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाची मुदत उलटून गेल्याने पुणे महानगरपालिकेने भिडे वाडा ताब्यात घेण्याचे नियोजन केले. रात्री पोलिसांनी ही वास्तू ताब्यात घेऊन पुणे महानगरपालिकेच्या हस्तांतरित केली . कायदेशीर प्रक्रिया द्वारे शांततेत सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली.

See also  ‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक-राज्यपाल