न्या.संदीप शिंदे समिती ९ डिसेंबर रोजी पुणे विभाग दौऱ्यावर

पुणे : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पुणे विभागाचा जिल्हानिहाय आढावा घेणार आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे. या दौऱ्यादरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले

See also  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन