बोपोडी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन

बोपोडी: विकसित भारताचा संकल्प घेऊन मार्गस्थ झालेल्या विकसित भारत रथ यात्रेचे बोपोडी येथे आयोजन करण्यात आले होते.

याअंतर्गत विविध लोकाभिमुख योजनांचे स्टॉल्स उभारून येणाऱ्या नागरिकांची योजनांसाठी नावनोंदणी करण्यात आली. यावेळी डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून विविध योजनांच्या माहितीची व या योजनांमुळे जनतेच्या जीवनात होत असलेल्या परिवर्तनाची माहिती सांगणारी चित्रफीत सादर करण्यात आली. विकसित भारताच्या या प्रवासाचे आपण सहप्रवासी होत आहोत याचा आनंद सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावर जाणवला, व लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंती दिनी त्यांना सर्वांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

त्यावेळी प्रकाश ढोरे, आनंद छाजेड, अनिलजी भिसे, डॉ. अजय दुधाने, बाळासाहेब रानवडे, सचिनजी वाडेकर, सचिन मानवतकर, उत्तम बहिरट, रोहित भिसे, अजित पवार, अवतडे काका, विजय जाधव, विजय जगताप, मयुरेश गायकवाड, संकेत कांबळे, अनिकेत भिसे, शुभम आयने, सिद्धांत जगताप, रवी नायर, अकबर शेख, बाळू सोरटे, देविदास रेड्डी, धीरज गुप्ता सागर मदने, भैयाराम अगरवाल व भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बाणेर मध्ये 'ग्रे स्टोन' इमारतीच्या बांधकामावरील क्रेन घरावर पडून अपघात