पाषाण : पाषाण-सुतारवाडी परिसरातील विविध रस्त्यांची कामे करण्याची मागणी पुणे शहर भाजपा चिटणीस श्री राहुल कोकाटे यांनी निवेदनाद्वारे पुणे मनपा पथ विभाग प्रमुख श्री अनिरुद्ध पावसकर यांचेकडे केली.
सुतारवाडी रस्त्याचे डांबरीकरण करावे,सुतारवाडी बस डेपो ते शिवशक्ती चौक रस्ता पुर्ण करावा,३६ मी बाणेर-पाषाण लिंक रोडचे काम त्वरित करावे. सुस रोड वर जो सायकल ट्रक केला आहे त्याचे जे कठडे आहेत ते त्वरित काढण्यात यावे जेणे करुन सुस रोड वरील वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे श्री राहुल कोकाटे यांनी केली. तर सर्व ठिकाणी दोन दिवसात प्रत्यक्ष पाहणी करुन त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.