संकल्प यात्रेच्या नावे मोदींची हमी नव्हे जुमलेबाजीच! – आम आदमी पार्टी

पुणे : केंद्र सरकारच्या ‘ विकसित भारत संकल्प यात्रा ‘ या अंतर्गत विविध शहरात, गावांमध्ये, मुळातच जुमला म्हणजे फसव्या , अपयशी ठरलेल्या केंद्रातील सरकारच्या योजनांचा प्रचार केला जात आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी तसेच पुणे शहरातही गेले पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ या पद्धतीच्या मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत स्टॉल उभारले जात असून स्टॉल वरील बॅनर वर मोदी सरकारची हमी असा नारा लिहिला गेला आहे. सरकारी योजनांच्या प्रचारामध्ये केंद्र सरकार हा शब्द वापरण्याऐवजी मोदी सरकार हा शब्द वापरणे हे संविधानाच्या विरोधी आहे. म्हणूनच आम आदमी पार्टीने सुद्धा ‘ मोदी सरकार ‘ हा शब्द वापरण्याला विरोध दर्शवला आहे. या संदर्भातले पत्र मुख्यमंत्री कार्यालय तसेच जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना पाठवले आहे.

कुठल्याही सरकारची धोरणे ही लोकशाहीने निवडून दिलेल्या त्या सरकारची असतात आणि त्याची अंमलबजावणी प्रशासन करत असते. त्यामुळे ही कुठल्याही एका व्यक्तीची धोरणे नसतात. निवडणूक काळामध्ये त्या व्यक्तीचा कर्तुत्वाचा प्रचार करणे ही बाब वेगळी असते मात्र ईतर काळात लोकांपर्यंत योजना पोहोचवताना एखाद्या पक्षाचा, नेत्याचा प्रचार करण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरणे अयोग्यच. भाजप नेते सततच निवडणूक प्रचाराच्या भूमिकेट्च असतात त्यामुळे बहुदा त्यांना याचे भान राहिले नसावे . सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक पालिका नगरपालिका पंचायती यामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. याचा फायदा घेत, प्रशासनाला केंद्र सरकारमधील योजनांचा एका व्यक्तीच्या नावे प्रचार करणे हे अयोग्यच असे आप चे मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारची आश्वासने म्हणजे जुमलेबाजी, थापाबाजी आहे असाच सर्व जनतेचा अनुभव आहे. शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे हमीभाव देणे, त्याचे उत्पन्न दुप्पट करणे, प्रत्येक नागरिकाला घर देणे, भ्रष्टाचार संपवणे, दरवर्षी दोन कोटी रोजगार पुरवणे अशी अनेक आश्वासने मोदी सरकारने दिली होती. परंतु ती सर्वच खोटी ठरली आहेत. त्यामुळे मोदींची हमी नव्हे, मोदींचा जुमला अशीच जनतेची भावना आहे. त्यामुळेच या प्रचाराला महाराष्ट्रात स्थानिक नागरिक विरोध करीत आहेत असे आप चे मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

See also  पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ह्यांचा पोलीस मित्र संघटने तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव