महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटचे वाटप

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत एमएचटी-सीईटी, जेईई, एनइएफटी-२०२५ साठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत असून पुणे जिल्ह्यातील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पात्र असणाऱ्या ९२ विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पुणे येथे आयोजित कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक विशाल लोंढे, समाजकल्याण निरीक्षक वैभव लव्हे, महाज्योती कार्यालयाचे विभागीय समन्वयक पल्लवी कडू उपस्थित होते. यावेळी ५५ विद्यार्थ्यांना टॅबलेट व सिमकार्डचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी श्री. लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपली बलस्थाने ओळखून त्यानुसार पुढील करिअरचे क्षेत्र निवडून टॅबलेट व सिमकार्डचा वापर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुढील शैक्षणिक कामकाजासाठी करावा, असे सांगितले.

See also  महात्मा फुले जयंती निमित्त बाणेर मध्ये 102 जणांनी केले रक्तदान