अयोद्धेवरून आलेल्या श्रीराम अक्षताचे हर्ष उल्हासात स्वागत

पुणे : २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येमध्ये श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोद्धेवरून आलेल्या अक्षतांचे आगमन आज पुण्यातील विद्यापीठ भागात झाले. त्या अक्षतांचे विधीवत पूजन शिवाजीनगर गावठाणातील श्रीराम मंदिरात झाले. विद्यापीठ भागातील ८ नगरातील दांपत्यानी पुजेत सहभाग घेतला. त्यावेळी अनेक राम भक्त उपस्थित होते.‌

तिथून ह्या अक्षता शिवाजीनगर, गोखलेनगर, विद्यापीठ परिसर, औंध, पाषाण, बाणेर बालेवाडी, बोपोडी आणि सुस नगरात श्रद्धेने नेण्यात आल्या. ह्या नगरात प्रवेश केल्यावर ह्या अक्षता कलशांची मिरवणूक फारच उत्साहाने काढण्यात आल्या. हजारो स्री, पुरुष आणि लहान मुलांनी ह्या मिरवणुकीत भाग घेतला.

१ जाने ते १५ जाने ह्या कालावधीत अनेक रामसेवक ह्या अक्षता घरोघरी प्रत्यक्ष पोहचवतील. राम भक्तांनी सर्व नागरिकांना ह्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

See also  'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो' च्या पूर्वतयारीची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी