शॉटगन क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला पहिल्यांदा सुवर्णपदक

पुणे : नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 011 भारत खुल्या स्पर्धा (शॉटगन) स्पर्धेत महाराष्ट्राचे यशवंत शिंदे, हर्षदेव चंदेल आणि विश्वजीत जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले. या क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले आहे.
या स्पर्धेमध्ये सर्व भारतामधून शंभर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

यशवंत शिंदे यांनी 67, विश्वजीत जाधव यांनी 58 तर हर्ष देव चंदेल यांनी 55 गुण मिळवून महाराष्ट्राला सुवर्णपदक दिले.

हर्ष देव चंदेल हे प्रशिक्षक हेमंत बालवडकर यांच्याकडे सराव करत होते.

See also  औंध विद्यांचल हायस्कूल आयोजित अंतर शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन