महामेट्रो विकास आराखडा जुमानत नसल्याने जनतेचा पैसा वाया: आप चा आरोप

पुणे : पुण्यामध्ये महामेट्रो आपलीच मनमानी करत महानगरपालिकेचे विकास आराखडे न जुमानता बांधकाम करत असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. महा मेट्रो ला बांधकाम थांबवण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. पुन्हा एकदा जनतेच्या पैशाचा चुराडा होणार आहे असा आरोप आप ने केला असून याला महा मेट्रो सोबत मनपा ची दिरंगाई पण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.


पुण्यामध्ये सर्वात रहदारीच्या पुणे युनिव्हर्सिटी गणेश खिंड रोडवरती शिवाजीनगर सिमला ऑफिस चौकाजवळ महा मेट्रो ने ४५ मीटर रस्ता रुंदीने बाधित जागे मध्ये बांधकाम केले आहे. तसेच शिवाजीनगर चौका कडून जुन्या एसटी स्टँड कडे जाणारा प्रस्तावित तीस मीटर रस्ता रुंदीतही बांधकाम केले असल्याचे आढळून आल्याने बांधकाम विभागाने जुलै मध्येच या बाबत मेट्रो ला कळवले होते. परंतु त्यास केराची टोपली दाखवली गेली.आता महानगरपालिका आयुक्तांनी महामेट्रो ला हे काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

आम आदमी पार्टीचे सह सचिव शंकर थोरात तब्बल सहा महिने याचा पाठपुरावा करत असून, ही कारवाई तेव्हाच तातडीने झाली असती तर जनतेचे नुकसान झाले नसते. परंतु यामध्ये महानगरपालिकेने दिरंगाई करत आता सहा महिन्यानंतर हे आदेश काढले आहेत.
वाकडेवाडी येथील खडकी च्या दिशेचा डीपी रोडवर मेट्रोने रूळ टाकल्याचे आढळून आले आहे. कृषी महाविद्यालयाचा नतावाडी येथील वाहीवाटीचा रस्त्यावर बांधकाम केल्याने रस्ता बंद झाला आहे. येरवडा येथे मेट्रोचा जिना रस्त्यामध्ये आला होता. अश्या अशा अनेक चुकांमुळे जनतेचा पैसा वाया जात आहे. मेट्रो हे पुणे मनपा बांधकाम विभागाकडून नकशे मंजूर करून घेत नसल्याने या चुका होत आहेत. या मनमानीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाला जबाबदार कोण असा सवाल आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

See also  स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे