शिवदृष्टी प्रतिष्ठान सुखसागर नगर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे आय फाउंडेशन, स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचलित माय माऊली केअर सेंटर पुणे, ससून नेत्र रुग्णालय पुणे, एच व्ही देसाई हॉस्पिटल महंमदवाडी पुणे, समता फाउंडेशन मुंबई, शिवदृष्टी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया, मोफत बीपी व शुगर तपासणी, डेंटल तपासणी, जनरल चेकअप व औषधे वाटप सुखसागरनगर भाग 2 महालक्ष्मी मंदिरा जवळ कात्रज पुणे येथे उत्साहात पार पडले.

सुखसागर नगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला. 145 नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी 22 नागरिकांची नोंद झाली. 85 नागरिकांनी बी पी शुगर तपासणीचा लाभ घेतला व 88 नागरिकांना जनरल चेकअप मोफत औषधे वाटप करण्यात आले. ज्येष्ठांनी या सर्व गोष्टींचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजक शिवदृष्टी प्रतिष्ठान पुणे प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल मेमाणे, अध्यक्ष सोमनाथ पालवे या वेळी माय माऊली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज चे संस्थापक व डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन, केट्रॅक्ट ला.विठ्ठलराव वरुडे पाटील,ला हेमलता जैन प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सभासद सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

See also  'अपत्यहीन जोडप्यांना'आयव्हीएफ'मुळे पालकत्वाची अनुभूती' दोन वर्षात 'बेनिकेअर'ने २५०० हुन अधिक जणांना बहाल केले मातृत्व; डॉ. चारुशीला बोरोले-पाळवदे यांची माहिती