शितोळे शाळेत विद्यार्थ्यांचा गुण गौरव

सांगवी:- स्मार्ट सिटीच्या नियोजनात विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली पाहिजे व त्यांचा विचार करून नियोजन केले पाहिजे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या विचारांकडे ही आपण लक्ष दिले पाहिजे असे मत वैष्णवी ग्रुप संचालक व उद्योजक दत्तात्रय नांगरे पाटील यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै.सौ.शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, शिशुविहार, नूतन माध्यमिक विद्यालय सांगवी आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेने याच वर्षापासून संस्थेचे संस्थापक, गुरुवर्य ,कै. प्राचार्य टी. आर. वाळके यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र संस्थेचे सदस्य मा. संजीव वाळके यांच्या वतीने गोल्ड मेडल आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू केला आहे ,त्याचे पहिले मानकरी गोल्ड मेडलिस्ट म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री शिवाजीराव माने यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले त्याबद्दल ते म्हणाले की संस्थेचे नाव छत्रपती शिवाजी आणि त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक ही शिवाजी हा योगायोगच आहे आणि त्याचेच प्रतीक म्हणून या संस्थेचे यश हे वाकण्या जोगे आहे म्हणूनच त्यांना हे गोल्ड मेडल मिळत आहे. त्यांना मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो .याचवेळी संस्थेच्या ज्येष्ठ सेविका श्रीमती कुसुम ढमाले यांना महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती पुणे जिल्हा यांच्यावतीने जिल्हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांना आदर्श सेविका पुरस्कार देण्यात आला.याप्रसंगी साडे पाचशे विद्यार्थ्यांना सामूहिक व वैयक्तिक बक्षिसांचे पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व राज्य पुरस्कार प्राप्त निवृत प्राचार्य मा. आबासाहेब जंगले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रज्वल एंटरप्राइजेस व मुरलीलाल स्टोन क्रेशर चे संचालक,उद्योजक मा.प्रकाश शेठ करपे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


यावेळी मा. दत्तात्रय नागने पाटील यांनी संस्थेला 51 हजार रुपये देणगी दिली व उद्योजक प्रकाश शेठ करपे यांनी 25 हजार रुपयाची देणगी दिली . यानंतर विद्यार्थ्यांचा विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम झाला यावर्षी देशाच्या रोप्य महोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे सांगता वर्ष असल्याने देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली .
याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, सचिव तुळशीराम नवले, उपाध्यक्ष सतीश साठे, पोपटराव भसे ,खजिनदार रामभाऊ खोडदे, शिक्षण तज्ञ डॉ. दिलीप गरुड, सदस्य प्रकाश ढोरे, सातारा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष संजय चव्हाण ,माध्यमिक विभाग प्रमुख शितल शितोळे, इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरठी , शिशु विहार प्रमुख संगीता सूर्यवंशी, नर्सरी प्रमुख शितल गरसुंड .उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनीता टेकवडे, हेमलता नवले, सीमा पाटील ,स्वप्नील कदम, मनीषा लाड, पंचशीला वाघमारे, भारती घोरपडे, श्रद्धा जाधव, दिपाली झणझने,गायत्री कोकाटे, संध्या पुरोहित ,स्मिता कुलकर्णी, नीता ढमाले, भाग्यश्री करे,निर्मला भोईटे ,कुसुम ढमाले ,मनीषा गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी व निवेदन आभार दत्तात्रय जगताप यांनी केले.

See also  कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! - ना. चंद्रकांत पाटील