ब्राह्मण समाजाच्या एकत्रीकरणाचे कार्य कौतुकास्पद – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुकोद्गार

सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार संपन्न
कोथरूड : ब्राह्मण समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना कार्यरत आहेत. मात्र, सर्व शाखीय ब्राह्मणांना एकत्रित करून, समाजाच्या समस्या सोडविण्यासाठीचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, असे कौतुकोद्गार नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, ह.भ.प. मोरेश्वर बुवा नागनाथ जोशी- चऱ्होलिकर महाराज, मा. नगारसेविका मंजुश्री खर्डेकर, मा.नगरसेवक सुशील मेंगडे, कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक जोशी, उपाध्यक्ष डॉ. वनमाळी वाईकर, कार्याध्यक्ष प्रमोद जोशी, सचिव रावसाहेब उन्हाळे, खजिनदार प्रकाश हडप, वासुदेव एकबोटे, डॉ. रमाकांत कुलकर्णी, डॉ. सुमेधा शिवदे, राजीव जोशी, सतिश ऋषिपाठक, अरुंधती जोशी, रुपा शास्त्री, प्रदीप दीक्षित, नागेश जोग, हभप अनुराधा प्रभुणे, प्रद्मा जोशी, संजिवनी उन्हाळे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, संपूर्ण देशभरात आणि राज्यात ब्राह्मण समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना कार्यरत आहेत. आपल्या परीने या सर्व संघटना ब्राह्मण समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. मात्र, सर्व शाखीय ब्राह्मणांना एकत्रित करून, समाजाच्या समस्या सोडविण्यासाठीचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार समाजोपयोगी उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अ. ल. जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी, सुहासिनी देशपांडे, जयमाला इनामदार, ज्येष्ठ अभिनेते बंडा जोशी, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र कुलकर्णी, प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट योगेश सुपेकर, श्रीराम रानडे, लेखक संशोधक आणि उद्योजक डॉ. अमोद साने यांचा ब्राह्मण महासंघाच्या वतीने मा. चंद्रकांतदादांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.राज्य सरकार कलाकारांच्या प्रती संवेदनशील असून विविध योजनांच्या माध्यमातून कलावंताना मदत व्हावी यासाठी मी देखील प्रयत्नशील आहे असे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

See also  विधाते वस्ती बाणेर येथील मनोज दळवी यांचा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश