बीजमाता पद्मश्री राहिताई पोपेरे यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना धान्याची राखी

राहिताईंचा वसा पुढे सुरू ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची पाटील यांची ग्वाही

कोथरूड : रक्षाबंधन! बहिण-भावाच्या प्रेमाचे अनोखे बंधन जपणारा सण. सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात आजचा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य तथा पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील हा सण उत्साहात साजरा करत आहेत.

नामदार पाटील यांना राज्यभरातून अनेक माता भगिनी रक्षाबंधनानिमित्त यांना शुभेच्छा देत आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बीजमाता पद्मश्री राहिताई पोपेरे यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना धान्यापासून राखी पाठवून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राहिताईंच्या या अनोख्या भेटीबद्दल भावना व्यक्त करताना नामदार पाटील म्हणाले की, सामाजिक जीवनात काम करताना अनेक माता भगिनींचे आशीर्वाद सदैव मिळत असतात, पण त्यातील हृदयस्पर्शी असतात, ते बीजमाता राहिताई पोपेरे यांचे! आपल्या पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक करणाऱ्या राहिताई दरवर्षी आठवणीने धान्यापासून बनवलेली राखी पाठवून आशीर्वाद देत असतात. राहिताईंचं कार्य इतकं मोठं आहे की, त्याला कशाचीच उपमा नाही. पण रक्षाबंधनात भावाने बहिणीला ओवाळणी द्यायची आपली प्रथा आहे. त्यामुळे राहिताईंचा वसा पुढे सतत सुरू ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन अशी यानिमित्ताने ग्वाही देतो.

See also  लोकशाहीमध्ये मतदारांना मिळालेला मतदान अधिकार हे देखील शस्त्र आहे - दिलीप क्षीरसागर