बराटे एम्पायर ,अशा रेसिडेन्सी कर्वेनगर परिसरातील रस्त्याचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भूमिपूजन

कर्वेनगर : कर्वेनगर प्रभागतील चिंतामणी रेसिडेन्सी, बराटे एम्पायर, आशा रेसिडेन्सी, पिनाक रेसिडेन्सी आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल येथिल १२ मीटर डीपी रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर सेलचे अध्यक्ष मा. डॉ. सुनील जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर डीपी रस्त्याचे काम मान्य डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये समाविष्ट असूनही अनेक दिवस प्रलंबित असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. यावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांच्यामार्फत आयुक्त साहेब, मनपा पथ विभाग यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि सदर काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न केले. या पाठपुराव्यास यश आले असून या रस्त्यास तरतूद उपलब्ध झाल्यानंतर पाठपुरावा करत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

याप्रसंगी रस्ता बाधित मूळ मालकांशी सल्ला मसलत चर्चा करत प्राथमिक ताबे यादी मनपाला हस्तांतरित करण्यात आली आणि ही प्रक्रिया पूर्ण होताच वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदारास देण्यात आली. या पाठपुराव्याची फलश्रुती म्हणून आज या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून त्वरित उद्यापासून प्रत्यक्ष कामास सुरवात होत आहे. यावेळी आजूबाजूच्या रहिवासी नागरिकांनी उपस्थिती दर्शवत समाधान व्यक्त केले. या नागरिकांच्या डोळ्यातील समाधान नक्कीच आनंददायी आणि उर्जादायी असून सदर काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी कर्वेनगर- कोथरूड विधानसभा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक सन्माननीय पदाधिकारी तसेच प्रभागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी माजी महापाैर व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डाॅक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डाॅ सुनिल जगताप, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.स्वप्नील दुधाने आणि लक्ष्मीताई दुधाने यांच्या विशेष प्रयत्नामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

See also  विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्सकडे वळायला हवे -डाॅ.जी.सतीश रेड्डीः