वरुडे पाटील यांना युवा भिमसेना राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार

पुणे: युवा भिमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने माउली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे संस्थापक अध्यक्ष ला.विठ्ठलराव वरुडे पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

युवा भिम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक सोलापूर येथे ज्येष्ठ नागरिक व रुग्ण यांच्या सेवा प्रित्यर्थ ला. विठ्ठलराव वरुडे पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
युवा भिमसेना या संघटनेच्या माध्यमातून क्रांतिकारी चळवळ वंचितांना व शोषितांना न्याय देण्याचे काम करते, मागील सहा वर्षापासून ही संघटना या क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील उत्तमोत्तम सामाजिक सेवा करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देन्यात येत असतो.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.महेश (अण्णा) डोलारे यांनी मनोगतातून पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. या प्रसंगी युवा भीम सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.


सत्काराला उत्तर देताना वरुडे पाटील यांनी सांगितले की अशा सन्मानामुळेच सामाजिक क्षेत्रात सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. सोबतच सामाजिक जबाबदारी व उत्साह देखील वाढला आहे. यापुढे सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त सचोटीने काम करण्याचा प्रयत्न राहील. हा सन्मान ज्येष्ठ व वृद्धाच्या सेवेमुळे मिळाला त्यांना समर्पित करत असून सन्मान दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद देत आभार मानले

See also  मुळशीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेचा विरोध