खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार त्यांच्याशी विविध समस्यांबाबत चर्चा

पुणे : पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली.

यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष मृणालिनी वाणी, मा. नगरसेवक सचिन दोडके, विशाल तांबे, सायली वांजळे, शुक्राभाऊ वांजळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

See also  स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय - पृथ्वीराज चव्हाण