आंबेगाव खुर्द सच्चाई माता परिसरात अंधार, मोहल्ला कमिटी मध्ये प्रश्न मांडूनही होत नाही कारवाई

आंबेगाव : पुणे पालिकेत नगरसेवक असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना खर्चासाठी परवानगी घ्यावी लागत होती.मात्र पालिकेचा नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे राज्य सरकारकडून पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनेक महिन्यापासून प्रशांत कांबळे हे मोहेला कमिटीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न मांडत आहे. सच्चाई माता परिसर अटल 12 आंबेगाव खुर्द येथे पथदिवेच नाहीत. त्या भागामध्ये पथदिवे लावण्यात यावे या संदर्भात वारंवार तक्रार देऊन देखील अध्याप पालिकेने तिथं कुठेही लाईट पोल लावण्यात आलेला नाही.

जिथे खरंच गरज आहे तिथे पालिका सुविधा देत नाही. मागील वर्षी फेब्रुवारी 2022 भारती विद्यापीठ येथील चांगले पोल असताना देखील बदलण्यात आले होते. पुन्हा एकदा ह्याच महिन्यामध्ये बरोबर एक वर्ष झाला आत्तासुद्धा तेच पोल मागील वर्षी बदलून देखील आता पुन्हा 22 पोल नव्याने बदली करत आहे. पालिकेचा भोंगळ कारभार भ्रष्टाचार हा चव्हाट्यावर आला आहे. पण ह्याकडे कोणाचाही लक्ष नाही. पालिकेमध्ये 2017 मध्ये हा भाग गेला असला तरी सुद्धा या भागामध्ये लाईट, पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन, सी सी टीव्ही कॅमेरे अस्तित्वात नाही. नागरिकांना सुविधा मिळणार कधी व भ्रष्टाचार थांबणार कधी असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. असे प्रशांत कांबळे आमच्याशी बोलताना म्हणाले.

See also  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून अकरा महिन्यांत ७१ कोटी ६८ लाखांची मदत वितरित