औंध : अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यांचल हायस्कूल आयोजित आंतर शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले .स्पर्धेचे हे अकरावे वर्ष आहे .
या कार्यक्रमाला माननीय श्री अमर कानडे, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल रेफरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
श्री ज्ञानेश्वर तापकीर [योगीराज नागरी पतसंस्था], श्रीअरुण खर्डे पाटील [उद्योगपती], श्री राजेश विधाते [योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष] श्री जनार्दन मुरकुटे पाटील, श्री राजेंद्र मुरकुटे पाटील, ॲड.अशोक रानवडे पाटील, श्री भानुदास मुरकुटे पाटील, श्री वसंतराव माळी, श्रीआनंदराव जुनवणे, श्री. बाळासाहेब पवार [उद्योगपती], हेमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बास्केटबॉल व फुटबॉल च्या ग्राउंड ची पूजा करून खेळाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक मुरकुटे, तसेच शाळा समितीचे सदस्य सौ योगिता बहिरट मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक, प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
श्री अशोक मुरकुटे यांनी सर्वांचे स्वागत केले. ज्ञानेश्वर तापकीर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व त्यांच्यातर्फे बक्षीस जाहीर केले.
श्री कानडे यांनी जिंकण्याबरोबरच हरण्याचेही महत्त्व अधोरेखित केले. हरल्याशिवय जिंकण्याचा आनंद मिळू शकत नाही म्हणूनच दोन्ही आनंदाने स्वीकारावे हे सांगितले
उद्घाटना प्रसंगी विद्यांचल हायस्कूल व डी बी मुरकुटे विद्यालय यांच्यात लढतीचा बास्केटबॉल सामना आणि मुरकुटे हायस्कूल व विद्यांचल हायस्कूल यांचा फुटबॉल सामना पार पडला .
फुटबॉल साठी ३५ संघांनी भाग घेतला असून बास्केटबॉल साठी ४० संघ सहभागी आहेत. पुढील आठवडाभर ही स्पर्धा चालू राहील. १२ डिसेंबर रोजी ह्या सामन्याचा सांगता समारंभ पार पडेल.