बाणेर दत्त मंदिर रस्त्यावरील खड्डे व पावसाचे पाणी साठू नये यासाठी उपाय योजना कराव्यात नागरिकांची मागणी

बाणेर : बाणेर येथे दत्त मंदिर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे या परिसरामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वारंवार तक्रार करून देखील याबाबत योग्य कारवाई होत नाही.

बाणेर मुख्य रस्त्याकडून पॅन कार्ड दत्त मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळणावरच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साठत आहे. तसेच या परिसरात असलेल्या खड्ड्यांमुळे या परिसरातील वाहतूक संथ गतीने होते. पर्यायाने मुख्य रस्त्यासह या चौकामध्ये वारंवार वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. गेले अनेक वर्ष या परिसरातील रस्ता रुंदीकरण देखील करण्यात आलेले नाही. अरुंद रस्त्यावर पाणी साठत असल्यामुळे चालणाऱ्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत असून वाहनांचे पाणी अंगावर उडत असल्याने अनेक वेळा वाद देखील होत आहे.

बाणेर मधील मुख्य रस्त्याला पर्याय म्हणून या रस्त्याचा वापर हजारो वाहन चालक करतात. असे असताना देखील या रस्त्याकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावे तसेच पावसाचे पाणी साठू नये यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  समता पर्व कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 258 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण