गुलटेकडी मार्केट यार्ड येथील श्री काळुबाई माता मंदिर येथे स्वच्छता अभियान

गुलटेकडी : गुलटेकडी मार्केट यार्ड आपल्या परिसरातील श्री काळुबाई माता मंदिर येथे मंदिर स्वच्छता अभियान श्री रामभक्त गणेश शेरला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग कार्यवाहक दर्शनजी मिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवण्यात आलं.

यावेळी मंदिरात प्रातिनिधीक स्वरुपात स्वच्छता करण्यात आली. व सर्व मंदिरातील छोटे मंदिर यावेळी स्वच्छ करण्यात आले व संपूर्ण शिखरावर सेटिंग मशीनच्या सहाय्याने पाण्याने स्वच्छ करून व मंदीरातील आतील सर्व भागात स्वच्छता करण्यात आले.

श्रीकाळुबाई माता मंदीर ट्रस्टी तात्या किसन डुंचे ,दत्ता तिंडे यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, सोमनाथ शिंदे, नागेश कांबळे,सचिन खंडागळे, प्रदीप वर्मा, विठ्ठल मांगडे,विकास गायकवाड ,मुन्ना शेख,शारदा साळवी,राजेद्र शहा,निवृत्ती शिळीमकर व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि परिसरातील रामभक्तांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला. मंदिर परिसर स्वच्छ केल्याबद्दल मंदिराचे प्रमुख किसन डुंचे यांनी गणेश शेरला यांचा सन्मान करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले व अशा उपक्रमाची या भागात गरज आहे असे भावना व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजक एकता सेवा प्रतिष्ठान संस्थापक गणेश शेरला व भारतीय जनता पार्टी प्रभाग 28 वतीने करण्यात आले.

See also  सुस-म्हाळुंगे हद्दीवर PMPML बस सेवा सुरु, आता लवकरच पाण्याच्या लाईनचे काम सुरु करणार - अमोल बालवडकर