पाषाण रोड येथील विघ्नहर्ता चौकामध्ये भर दिवसा बस स्टॉप चोरी नागरिकांच्या सजगतेने थांबली

पाषाण : पाषाण सुस रोड येथील विघ्नहर्ता चौकामध्ये भर दिवसा तीन महिन्यापूर्वी बसवण्यात आलेला नवीन बस थांब्याचा शेड चोरण्याचा प्रयत्न करीत असताना नागरिकांनी अडवले यानंतर संबंधित बस स्टॉपचे शेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगारांना पालिकेच्या आदेशाची प्रत मागितल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला.

विघ्नहर्ता चौक सुस रोड येथे गेल्या नोव्हेंबर महिन्यातच बसवण्यात आलेला चांगला बस स्टॉप काढण्यात येत होता, काढणाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची ऑर्डर नव्हती व तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी असलेला बस स्टॉप का काढण्यात येत आहे असे विचारले असता त्यांच्याकडे कुठले उत्तर दिले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी समीर उत्तरकर यांनी संबंधित काम थांबवण्यात या कामगारांवर कारवाई करण्याची मागणी केली. शासकीय पैशाचे उधळपट्टी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत अधिक माहिती घेतल्यावर हा बस स्टॉप पिंपरी चिंचवडला घेऊन जायचं आहे अशी उत्तरे काही कर्मचाऱ्यांनी दिली.

यामुळे ही बस स्टॉप ची पळवा पळवी आहे की दिवसा होत असलेली चोरी याची चौकशी करण्यात यावी तसेच या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

See also  नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी