कात्रज : रामनामाचा जयघोष, हातात फडकवले जाणारे भगवे झेंडे, रामजन्मापासून रामराज्य येईपर्यंतचा नाट्य रूपातून उलगडलेला जीवनपट आणि प्रख्यात प्रवचनकार गणेशमहाराज भगत यांची अमृतवाणी अशा सगळ्या मंगलमय आणि राममय वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला.
अवघ्या देशातील सगळे वातावरण राममय झालेले असताना आपल्या प्राईड इंग्लिश स्कुल मध्ये आज रामभक्तीचा महापूर आलेला होता.. अलोट उत्साहात मुलं आणि त्यांचे पालक सहभागी झालेले होते.
सुरुवातीला गणेशमहाराज भगत यांनी आपल्या अमोघ वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रभु रामचंद्राच्या आयुष्यातून आपण काय घ्यावे आणि आपले आयुष्य कसे संस्कारीत करावे याचे मार्गदर्शन केले. प्राईड इंग्लिश स्कुलच्या मुलांनी रामचरित्र नाट्यरुपाने सादर केले. त्यात सगळेच रंगून गेले. शिक्षिकानी उत्तम निवेदन करून कार्यक्रमाला रंगत आणली. प्रभु रामचंद्रांचा राज्याभिषेक सोहळा मुलांनी ज्या पद्धतीने सादर केला आणि त्यांची जी मिरवणूक काढण्यात आली तो कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला. भगवे झेंडे हाती फडकवत मुले श्री रामाच्या जयघोषात हरवून गेली आणि त्यांनी त्यांच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला.
यानिमित्ताने प्रमुख पाहुणे आप्पा रेणूसे, उद्योजक मयूर शहा, मनीष शहा, विलासराव भणगे, पराग पोतदार, सचिनजी डिंबळे, मुख्याध्यापिका शर्मिला पांडे , जयदिप निंबाळकर,मनोज तोडकर , शिरीष चव्हाण, व आप्पा रेणूसे मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.