बौद्ध उद्योजकांना स्थानिक ते जागतिक पातळीवर व्यवसायाची संधी – सुनील माने

बौद्ध उद्योजकांच्या वेबसाईटचे अनावरण
पुणे : जागतिक स्तरापासून स्थानिक पातळी पर्यंत व्यवसायाच्या संधी शोधून त्यादृष्टीने आपल्या व्यवसायात वाढ करावी. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वत्र नेटवर्क तयार करून समाजात व्यवसाय उद्योगधंदे याबाबत व्यापक काम करावे, यानंतर जागतिक पातळीवरही आपल्याला संधी मिळेल असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते बौद्ध उद्योजकांच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.

कुरुळी ता.खेड येथे झालेल्या या कार्यक्रमाला बुद्धीस्ट बिजनेस कम्युनिटी असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. श्याम वाकोडे, उपाध्यक्ष प्रशांत तुळवे, सचिव संतोष येवले, विशाल गायकवाड, धम्मदीप गवारगुरु, नितेश नितनवरे, अभय नगरे, विष्णू इंगोले, मिलिंद इंगळे, प्रशांत घोगरे, नितीन गवई, उपसरपंच गुलाब कांबळे, ग्राम पंचायत सदस्य प्रतिभा कांबळे, पोलीस पाटील प्रतिभा तुषार कांबळे, लालासाहेब कांबळे, उत्तम कांबळे, पोपट कांबळे, रवींद्र अस्वरे, तुषार कांबळे, तारकेश्वर कांबळे, सागर कांबळे, दीपक कांबळे, प्रशांत माता रमाई बचत गट, पंचशील महिला बचत गट, तथागत बचत गटाच्या सदस्या तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना सुनील माने यांनी महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची व त्यांच्या समन्वयाची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी प्रवास केलेल्या अमेरिका, चीन पासून जगभरातील विविध देशांच्या व्यवसाय, उद्योग क्षेत्राची माहिती उद्योजकांना दिली. आगामी काळात भारतात कोणते व्यवसाय वाढतील आणि कोणते कोणते बंद पडतील याबाबतचेही विवेचन त्यांनी यावेळी केले. आपल्या उद्योजकांनी मुलभूत व्यवसायाबरोबरच अत्याधुनिक व्यवसायाचीही कास धरली पाहिजे. संशोधन आणि नवीन उत्पादने यांची वानवा या क्षेत्रात परंपरांमुळे भारत मागास देश समजला जातो. त्यादृष्टीने आपण आधुनिकता जोपासली पाहिजे आणि व्यवसायाच्या नव्या वाटा शोधल्या पाहिजेत. भारताच्या आर्थिक क्षमतेएवढी न्यूयॉर्क महानगराची क्षमता आहे. न्यूयॉर्कच्या तीनपट क्षमता शांघाय महानगराची आहे. यात संपूर्ण भारत देश म्हणून आपले स्थान काय ते कसे आणखी सुधारेल त्यात आपल्या मागास समाजाचे स्थान काय राहील याचा विचार करून धोरणे आखली पाहिजेत. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

मागास समाजातील उद्योजकांना उभे करायचे असेल तर सामाजिक न्याय विभागातील खरेदी पासून याची सुरुवात शासनाला करता येईल पण असे होत नाही. एस.सी आणि एसटी समाजाला राज्यशासन,केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडून काही विशेष निधी प्राप्त होतो. गेल्या १० वर्षांपासून योग्य तो निधी राज्य शासनाकडून आपल्याला मिळाला नसल्यामुळे या नागपूर अधिवेशनात मी मुख्यमंत्र्यांना हा निधी वितरीत करावा यासाठीचे निवेदन दिले आहे. उद्योग करत असताना शासकीय पातळीवर समस्या निर्माण झाल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असे ही त्यांनी यावेळी सांगतिले.

विविध उद्योगांमध्ये पुरवठा साखळीत (सप्लाय चेन) आपले स्थान निर्माण करा, जागतिक दर्जाची गुणवत्ता राखत काम करा, जगातल्या उत्पादनांच्या चॅनल पार्टनर बनण्याचा प्रयत्न करत व्यवसाय वाढवा. गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नका असे आवाहन त्यांनी या कार्यक्रमात केले.
तैवानमध्ये फॅाक्सकॅान कंपनीबरोबर पालकमंत्री गिरीश बापट आणि आपण केलेल्या बैठकीची आणि ही कंपनी पुणे जिल्ह्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माने यांनी यावेळी माहिती दिली. एखादा उद्योग परिसराची अर्थव्यवस्था कशी बदलतो आणि त्यासाठी आपण काय केले पाहिजे याबाबत त्यांनी विश्लेषण केले.

बौद्ध बिझनेस कम्युनिटी फक्त त्यांच्या व्यवसायाचा विचार न करता समाजासाठी काम करत आहेत ही वाखानण्याजोगी गोष्ट आहे. भविष्यात या संघटनेने रोटी,कपडा, मकान आणि इंटरनेट या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत हे समजून या गरजा पुरवण्यासाठी काम करावे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातील परदेशातील संधी पाहता इंग्रजी बरोबरच परदेशी भाषाही विद्यार्थ्यांनी आत्मसात कराव्यात असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

प्रा. श्याम वाकोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बुद्धीस्ट बिजनेस कम्युनिटी असोसिएशनबद्दल माहिती दिली तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत तुळवे यांनी आभार प्रदर्शन केले.

See also  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना गुलाबपुष्प देऊन वाहतूक जणजागृती - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) क्रीडा सेलचा लक्ष्मी रस्त्यावर उपक्रम