मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांनी दिली अधिसूचना प्रत

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण मोसंबीचा रस देऊन सोडवले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री.जरांगे यांना शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत देत त्यांच्या कपाळाला गुलाल लावत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

See also  देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी - उपमुख्यमंत्री