पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 76 व्या पुण्यतिथीनिमित्त जन संघर्ष समिती पुणे च्या वतीने गोखले इन्स्टिट्यूट ते काँग्रेस भवन अशी पदयात्रा काढण्यात आली. तसेच यावेळी “व्यर्थ न हो बलिदान” ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. पुणे शहर काँग्रेस जिल्हा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री अरविंदजी शिंदे यांच्या हस्ते याचे प्रकाशन करण्यात आले. या निमित्ताने बोलताना अरविंद शिंदे यांनी महात्मा गांधीजींचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारच्या पुस्तिका आणि पदयात्रा हे कार्यक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
जन संघर्ष समितीतर्फे ॲड रवि रणसिंग प्रा. विकास देशपांडे ॲड. संदीप ताम्हनकर श्री संतोष पवार श्री विनय गाडे तसेच डॉ प्रवीण सप्तर्षी मिसेस सप्तर्षी मिसेस देशपांडे हरिभाऊ टिकेकर श्री भोला वांजळे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे प्रवक्ते श्री गोपाळ तिवारी तसेच सरचिटणीस श्री अभय छाजेड हे देखील पदयात्रेत सहभागी झाले होते आणि त्यांनी यानिमित्त गांधीजींच्या कार्याचे स्मरण केले.