कोथरूड महिला कॉंग्रेसच्या “हळदी कुंकू समारंभ” प्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर यांनी साधला संवाद

कोथरूड : कोथरूड महिला कॉंग्रेसच्या सौ. मानसी राज जाधव व सौ. सविता ओंकार धुत यांच्या वतीने “हळदी कुंकू समारंभ” वांजळे सभागृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आले होते. कोथरूड परिसरातील १५० हून अधिक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. वाण म्हणून “फ्रुट बास्केट” महिलांना देण्यात आले.


यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार व प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश महिला कॉंग्रेस सरचिटणीस मा. स्वातीताई शिंदे,
पुणे महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा मा. पुजाताई मनिषजी आनंद, शहर उपाध्यक्षा मा. प्राचीताई दुधाने, शहर सरचिटणीस मा. नयनाताई शिवाजी सोनार, कोथरूड महिला सरचिटणीस मा. सुरेखाताई किशोर मारणे, मा. अभयाताई महेश विचारे, मा. विद्याताई लव्हार्डे, मा. संगीताताई चोरगे,मानसी जाधव, राज गोविंद जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष व्यवस्थापन सौ. सारीका गाढवे, सौ. मोहीणी आहेर, सौ. सायली गाढवे, सौ. सोनाली मोकाटे, डॅा. वैशाली बोरसे, सौ. रत्ना सायबाने, सौ. संध्या भराडीया, सौ. भंडारी, सौ. राखी सारडा, सौ. हर्षा शेट्टी, राणी चिंतामणी यांनी केले.

See also  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा अभियान बाणेर संस्थेच्या माध्यमातून एक हजार झाडांचे वृक्षारोपण