बसथांब्यामध्ये बैठक व्यवस्था बसविण्याबाबत मनसेचे मागणी

पुणे : छत्रपती शिवाजीनगर व कोथरूड विधानसभा मतदार संघातील अनेक रस्त्यांवरील बसथांब्यामध्ये बैठक व्यवस्था नसल्यामुळे लहानमुले, महिलाभगिनी, जेष्ठनागरिक यांना बसथांब्यामध्ये बसायला जागाच नाही. त्यामुळे बसच्या प्रवाश्यांना भर उन्हात बसची वाट बघत ताटकळत उभे रहावे लागत आहे. उन्हाळा मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने नागरिक उन्हाच्या तापाने आजारी पडण्याची शक्यता आहे.


अनेक नागरिक सतत आमच्या पक्षाच्या कार्यालयात येऊन तक्रारी करत आहेत. त्यामुळे अनेक नागरिक स्वतःची दुचाकी खरेदी करत आहेत. आधीच रस्त्यावर वाहतुककोंडीची मोठ्या प्रमाणावर समस्या होत आहे.
उन्हाळा वाढायच्या आधी येत्या १५ दिवसात नागरिकांना बसथांब्यामध्ये बस येण्यापर्यंत किमान बसण्याची व्यवस्था करावी.
जर येत्या १५ दिवसात सर्व बसथांब्यामध्ये बैठक व्यवस्था बसविली गेली नाहीतर मनपाच्या दारात व बैठक व्यवस्था नसणाऱ्या थांब्यावर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल व होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची आपण नोंद घ्यावी, अशाप्रकारचे निवेदन महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना मनसे उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या वतीने देण्यात आले.

)

See also  पुण्यातील नद्यांच्या पूररेषांचा सर्वंकष आढावा घेऊन पूररेषा नव्याने आखण्याची गरज - मुंबई उच्च न्यायालय