नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्टीक स्पर्धेत पुण्याच्या साहिल मरगजे व सौख्या शेटे ची नेत्रदिपक कामगिरी सौख्या ला कांस्य तर साहिल सिल्व्हर पदकाचे मानकरी

धनकवडी : जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने केरळ येथील व्ही.के. कृष्ण मेनन इनडोअर स्टेडियम मध्ये नुकत्याच पार पडलेल्या टंबलिंग जिम्नॅस्टिक्स नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्याच्या सौख्या शेटे व साहिल मरगजे यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना नेत्रदिपक कामगिरी केली असून सौख्या ने  वैयक्तिक गटात कांस्य तर साहिल ने सांघिक प्रकारात सिल्व्हर पदक पटकावले आहे. तर आर्टिस्टिक्स जिमनॅस्टिक्स स्पर्धेत हेरंब चव्हाण याने पॉमेल हॉर्स प्रकारात कांस्य पदक मिळविले आहे.

साहिल मराठवाडा मित्रमंडळ काॅलेज ऑफ काॅमर्स मध्ये वाणिज्य शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून मागील दहा वर्षांपासून तो जिमनँस्टिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. साहिलने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावताना २०१९ मध्ये दिल्ली येथील नँशनल स्पर्धेत द्वितीय क्रमांका सह नॅशनल चॅम्पियन जिम्नॅस्टिक प्लेयर म्हणून नावलौकिक मिळविला होता.

तर सौख्या शेटे गरवारे महाविद्यालयात शिकत असून दोघेही सद्या राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते, सहायक पोलीस निरीक्षक मुंबई पोलीस सौरभ कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एसके जिमनॅस्टिक्स अँकॅडमीमध्ये जिमनँस्टिकचा सराव करत आहे.

See also  स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी गोळाबेरीज सुरु