ऋतुध्वज सोशल फाऊंडेशन च्या वतीने गुरुकुल वसतीगृह (आश्रम) अनाथ आश्रमात मुलांना व्याख्यान व धान्य वाटप

पुणे : ऋतुध्वज सोशल फाऊंडेशन च्या वतीने गुरुकुल वसतीगृह (आश्रम) कासारी फाटा,पुणे-नगर रोड.शिक्रापूर या ठिकाणी अनाथ आश्रमात मुलांना व्याख्यान व धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ह.भ.प.सृष्टी पिंगळे महाराज यांनी मुलांना व्याख्यानाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष- हेरंब नगरे, युवासेना पुणे उपजिल्हाप्रमुख-रेवणनाथ गायकवाड, मा.उपसरपंच श्री.विश्वनाथ शिर्के, मा.ग्रा.पं.सदस्य-श्री.वसंत गायकवाड,श्री हिरामण गायकवाड ई.मान्यवर व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वसतीगृह ही काळाजी गरज असुन त्यांना मदत करण्यासाठी नगरे साहेब यांच्या सारखे अनेक मान्यवरांनी पुढे आले पाहिजे असे मत मा.उपसरपंच विश्वनाथ शिर्के यांनी व्यक्त केले. तसेच गुरूकुल वसतीगृहाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी ऋतुध्वज सोशल फाउंडेशन चे व उपस्थित सर्वाचे आभार मानले.

See also  शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार