वरुडे पाटील यांना महाराष्ट्र लहुजी आर्मी राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार प्रदान

पुणे : महाराष्ट्र लहुजी आर्मी सामाजिक संघटना यांचे वतीने माउली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे संस्थापक अध्यक्ष  ला.विठ्ठलराव वरुडे पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र लहुजी आर्मी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून माननीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन सणस मैदान समोर पुणे येथे ज्येष्ठ नागरिक व रुग्ण यांच्या सेवा प्रित्यर्थ ला. विठ्ठलराव वरुडे पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.


यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी गृहराज्यमंत्री मा.रमेशदादा बागवे कार्यसम्राट आमदार मा.रवींद्रजी धंगेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष मा.प्रशांतभाऊ जगताप माजी नगरसेवक मा.अविनाशभाऊ बागवे सामाजिक कार्यकर्ते मा.गणेशभाऊ मोहिते सामाजिक कार्यकर्ते मा.उदयभाऊ जगताप संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष विशालभाऊ सकट.तसेच संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
महाराष्ट्र लहुजी आर्मी या संघटनेच्या माध्यमातून  त्यांना क्रांतिकारी चळवळ वंचितांना व शोषितांना न्याय देण्याचे काम करते, मागील तीन वर्षापासून ही संघटना या क्षेत्रात कार्यरत आहे. या वर्षापासून वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील उत्तमोत्तम सामाजिक सेवा करणाऱ्या संस्थांना दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विशालभाऊ सकट यांनी मनोगतातून पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. या प्रसंगी महाराष्ट्र लहुजी आर्मी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना वरुडे पाटील यांनी सांगितले की अशा सन्मानामुळेच सामाजिक क्षेत्रात सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. सोबतच सामाजिक जबाबदारी व उत्साह देखील वाढला आहे. यापुढे सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त सचोटीने काम करण्याचा प्रयत्न राहील. हा सन्मान ज्येष्ठ व वृद्धाच्या सेवेमुळे मिळाला त्यांना समर्पित करत असून सन्मान दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद देत आभार मानले

See also  जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख