शिरुर व बारामती तालुक्यातील अनुक्रमे मूग व बाजरी पिकासाठी नुकसान भरपाई निश्चित

पुणे : खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शिरुर तालुक्यात मूग व बारामती तालुक्यात बाजरी हे मुख्य पीक म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. अपुरे पाऊसमान, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शिरूर तालुक्यातील ४ मंडळ गट, मंडळामध्ये व बारामती तालुक्यातील ३ मंडळ गटांमध्ये पीक पेरणी, लावणीपूर्व नुकसानभरपाई निश्चित करण्यात आल्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केली आहे.

शिरुर तालुक्यातील मुग हे अधिसुचित मुख्य पीक असून या पीकांसाठी एकूण १० तसेच बारामती तालुक्यात बाजरी हे अधिसुचित मुख्य पीक असुन या पिकासाठी एकूण ११ अधिसुचीत मंडळ,मंडळ गट अधिसुचित करण्यात आले आहेत.

जिल्हास्तरीय समिती मध्ये दिलेल्या निर्देशानुसार बारामती व शिरुर तालुक्यातील काही मंडळ गट व मंडळांमध्ये अनुक्रमे बाजरी व मुग या पिकांचे नजर अंदाज सर्वेक्षणाअंती अधिसूचित क्षेत्रामध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी झाली नसल्याबाबत अहवाल प्राप्त आहेत.

शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे अधिक कोरेगाव भिमा हे मंडळ गट, पाबळ, न्हावरा, वडगाव रासाई मंडळ असे ४ अधिसूचित मंडळ गट, मंडळामध्ये व बारामती तालुक्यातील बारामती अधिक उंडवडी क.प. अधिक काटेवाडी मंडळ गट, माळेगाव अधिक पणदरे अधिक वडगाव निबांळकर अधिक शिर्सुफळ असा मंडळ गट आणि सुपा अधिक लोणीभापकर अधिक मोरगाव अधिक करंजेपुल मंडळ गट अशा ३ मंडळ गटामध्ये सरासरीच्या ७५ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर उगवण अथवा पेरणी न झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

त्यामुळे पिक पेरणी, लावणीपूर्व नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी अधिसूचना काढण्यात येत आहे. मुगाकरीता विमा संरक्षीत रक्कम रुपये २० हजार रुपये प्रति हेक्टर व बाजरी करीता विमा संरक्षित रक्कम रुपये २४ हजार रुपये प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के पर्यंत मर्यादेत नुकसान भरपाई निश्चित करण्यात येत आहे.

अधिसूचित मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कम विहित मुदतीत भरलेली आहे किंवा त्यांच्या बँक खात्यातून विमा हप्ता रक्कम वजा करुन घेण्यात आलेली आहे, असे शेतकरी या मदतीसाठी पात्र आहे. अधिसूचनेनंतर ३० दिवसाच्या आत विमा कंपनीने नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

See also  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३२ हजार फलक हटविले